वाढदिवसाच्या शूभेच्छांसाठी धन्यवाद

नमस्कार, आपल्या सगळ्यांच्या शूभेच्छांनी खरं तर मी खूपच भारावून गेलोय… फेसबूक / whatsapp वर मित्र नसलो तरी जवळचे मित्र व आप्तेष्ट वाढदिवसाच्या शूभेच्छा देतात हे नव्यानेच कळले….आज मी वयाची सव्वीस वर्षे  पूर्ण केली… आयूष्यातील स्वातंत्र्याचे पर्व पूर्णतःच संपले आज असे म्हणायला हरकत नाही… आणि जबाबदाऱ्या आणि सोबत अधिकार कायमस्वरूपीचे अंगी येऊन पडले…. आजवरचा प्रवास खूपच सूखद होता… रखरखत्या उन्हात कधी जाण्याची वेळ नाही आली (जनता विद्यालय ची दूपारची शाळा याला अपवाद आहे.).. … बारावीनंतर सलग दहा वर्षापासून मला नालायक म्हणणारे माझे नातेवाईक… पण वयाच्या चोविसाव्या वर्षीही मूलाला घरात पोसणारे आईवडिल…

Read More

दसऱ्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,  दसऱ्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!! हिंदू संस्कृतीला नुसार आज चा दिवस म्हणजे  “असत्य” वर “सत्य” चा विजय साजरा करत पुढील वाटचाल . ईश्वर आपली हि वाटचाल सुखद करो हीच प्रार्थना . वेळे चा आभाव म्हणून फोन नाही केला , तसं पाहता आज सगळ्यांना वैयक्तिक फोन करून शुभेच्छा द्यायच्या होत्या तसा प्रयत्न मी गेल्या दिवाळीत केला होता,  सुट्टी होती आणि मी प्रत्येकालाच फोन हि केला होता पण ५० लोकांना शुभेच्य्या देण्यात ५ तास गेले पुढे हि काही लोकांना फोन करायचे होता पण ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खलन केल्याचे झाले असते…

Read More

शाहरूख खान द्वेष

आपल्या जनमाणसात खूपच विचित्र  स्वभाव आहे . तो आहे शाहरूख खान बद्दल चा .. एकदा त्याने पाक मधील शाळेला 40 कोटी काय दिले… प्रत्येक वेळी त्याचा नवीन सिनेमा आला की तिच आठवण करून लोकांच्या मनात त्याच्या बद्दल चिड निर्माण केली जाते…  पण पाकमध्येही आपले सिनेमे प्रदर्शित होतात… आपले सिनेमे तेथूनही बक्कळ पैसा कमावतात…. तेव्हा अज्ञानी लोकांनी हे ही लक्षात घ्यायला हवे… अर्थात शाहरूख खान हा सर्वाधिक श्रीमंत भारतीय कलाकार आहे तेव्हा बर्‍याच जणांना त्याची इर्षा असेल यात काही शंका नाही व शेकडो कोटी चा उत्पन्न कर भरून तो भारतीय अर्थव्यवस्थेला…

Read More

“मूका मोर्चा” ची वायफळ चर्चा

गेले अनेक दिवस चर्चेत आलेला “मूका मोर्चा” शब्द खूपच गाजला मूक मोर्चा इतकी प्रसिद्धी हि त्याने बळकावली… व्यंगचित्रकाराने त्याच्या कलेतील रंग उधळले कदाचित त्यामूळे उद्भवणारे प्रसंग त्याला पूर्वावगत नसावे… ही झाली घोडचूक. यानंतर सेनेचे सर्व शत्रू एकत्र आले. … मराठ्यांची भावना दूखावणारे ते चित्र नक्कीच लाजीरवाणी बाब होती… परंतू या वेळी मराठ्यांसोबतच, सेनेच्या पक्षीय विरोधकांचा उत्साह ओसंडून वाहत होता अनेक भ्रामक गोष्टी पसरतांनाही बघायला मिळाल्या. तरीही मराठ्यांना विनंती आहे भूलथापांना बळी पडू नका। आता तर वातावरण शांत आहे.. पण नवीन भ्रांत आपली वाट पाहत आहे.

Read More

डेंग्यू बद्दल सर्व माहिती

डेंग्यू म्हणजे काय ? डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू ताप हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो डेंग्यू ताप किंवा डीएचएफ असण्याचा संशय असलेल्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांना भेटावे डेंग्यू तापाची चिन्हें आणि लक्षणे एकदम जोराचा ताप चढणे डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे डोळ्यांच्या मागील…

Read More

deepakdhande.com वर आपले स्वागत आहे

!!! भैरवनाथाय नमः !!!     प्रत्येक वेळी हवं ते बोलायला नाही जमत , म्हणून लिहायला तरी जमतंय का? म्हणून म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे ?  त्याचीच हि सुरुवात म्हणून हा ब्लॉग सुरु करतोय.   DeepakDhande.com हे संकेत स्थळ सुरु करण्यासाठी तसं  नवल काही नाही . इंटरनेट वर हजारो संकेतस्थळाची मालकी भूषवित असतांना . आपल्या नावाची हि एक वेबसाईट असावी असं गेल्या दहा वर्षांपासून वाटत होते.  आणि आता हे वाटणं  मी सत्यात उतरवत आहे . सर्व प्रथम मी माझी ओळख करून देतोय . माझे नाव दिपक शिवाजी धांडे, नाशिक जिल्ह्यातील…

Read More